Dr. Sachin Deore

सर्जरीची उत्क्रांती आणि मॉडर्न सर्जरी डॉ. सचिन देवरे: आधुनिक काळाचे सर्जन

Dr. Sachin deore - Best Multispeciality Hospital in Nashik

Dr. Sachin Deore

General Surgeon

डॉ सचिन देवरे हे मूळचे सटाणा तालुक्यातील करंजाड येथील असून त्यांनी प्राथमिक शिक्षण मालेगाव येथे पूर्ण केले. पुण्यातील तळेगाव येथील एमआयटी महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये फादर ऑफ लेप्रोस्कोपिक सर्जरी प्रोफेसर सर डॉ. उडवाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जनरल व लॅप्रोस्कोपी सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. या काळात भारतातील व परदेशातील अनेक राजकीय, क्रीडा, सिनेतारक-तारकांच्या उपचार टीमचा भाग होते. त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल, सर एच. एन. हॉस्पिटल या ठिकाणी सेवा देत विविध तज्ञांकडून सर्जरीचे कौशल्य आत्मसात करून घेतले. त्यानंतर त्यांनी होली क्रॉस हॉस्पिटल, मेघालय व सेंट लुक्स (जर्मन) हॉस्पिटल येथे दोन वर्ष कार्यभाग सांभाळला. सुमारे ५ वर्षापासून ते नाशिकमध्ये कार्यरत असून सरु हॉस्पिटल, मुंबई नाका, निम्स हॉस्पिटल गंगापूर रोड व रामालयम हॉस्पिटल, पंचवटी याचे ते संचालक आहेत. यासह सुमारे  २८ विविध हॉस्पिटल्समध्ये ते लॅपरोस्कोपिक व जनरल सर्जन म्हणून सेवा देतात.

त्यांनी आजवर पाच हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. ज्यात अनेक किचकट शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तसेच एकाच रुग्णात दोन हजाराहून अधिक पित्ताशयाचे खडे काढण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. सर्जरीमध्ये प्रतिष्ठित व मानाच्या अनेक पदव्या व फेलोशिप त्यांनी संपादन केल्या आहेत.

– डीएनबी, एम.एस. मेंबर ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, असोसिएशन ऑफ मिनिमल ऍक्सेस सर्जन इंडियाचे सदस्य, फेलोशिप इन ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रो एंडो सर्जनचे सदस्य, असोसिएट फेलो इन इंडस्ट्रीयल हेल्थ इ.